सरकारलाच बोंड अळी लागली आहे 

सरकारलाच बोंड अळी लागली आहे 

धनंजय मुंडे

नागपूर :  ज्या संवेदनशीलतेने विरोधी पक्षांनी बोंडअळीग्रस्त, धान उत्पादक, कृषी, वीज याचे प्रश्न  मांडले त्या संवेदनशीलतेने सरकारच्या मंत्र्यांनी उत्तर दिले नाही. मदतीची घोषणा केली नाही, शेतक-यांना वा-यावर सोडले एक दिवस हा शेतकरी सरकारला वा-यावर सोडल्याशिवाय राहणार नाही , बोन्ड अळी सरकारलाच खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

बोंड अळीमुळे उध्वस्त झालेल्या कापूस शेतकऱ्यांना २५ हजाराची हेक्टरी मदत देणार का? अशी मागणी आम्ही केली होती. पण त्यावर काहीच उत्तर दिले नाही. शरद पवार यांच्यासोबत विडियो कॉन्फरन्सींगद्वारे नितीन गडकरी, राधेमोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर एनडीआरएफ कडे मदत मागितली गेली. पण ती मिळाली की नाही? याबाबत माहिती दिली नाही.२७ शेतकरी किटकनाशक फवारणीमुळे मृत्युमुखी पडले त्यातील फक्त १८ शेतकऱ्यांना दोन लाखांची मदत मिळाली आहे. याबद्दलरी कोणताच उल्लेख मंत्र्यांनी उत्तर दिलेले नाही.

एसएलबीसीने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी सरकारकडे दिली असेल तर आज ती सभागृहात मांडायला पाहीजे होती. पण एसएलबीसीने यादीच सरकारला दिलेली नाही.इनोव्हेव कंपनीकडून कर्जमाफीत ऑनलाईन घोटाळा झालेला आहे. त्या कंपनीवर काय कारवाई करणार? याचेही उत्तर आम्हाला पाहीजे होते.बोंड अळीमुळे कापूस तर उध्वस्त झाला. पण हरबरा, ज्वारी यासारखी पिके वीज मिळत नाही त्यामुळे पाण्याअभावी वाया जात आहेत.हे शेतकरी शेतकर्‍यांच्या पुर्णपणे विरोधात असल्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो असे सांगत मुंडे सह सर्व विरोधी पक्षांनी सभात्याग केला

Previous articleमुंबई महानगरपालिका विभाजनाच्या मागणीवरून गदारोळ
Next articleकेईएम मध्‍ये निर्भया सेंटर तीन महिन्‍यात कार्यान्‍वयीत करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here