आता सातही दिवस दुकाने सुरू राहणार
नागपूर : राज्यात आजपासुन महाराष्ट्र दुकाने व आस्थापना हा अधिनियम लागू झाल्याने यापुढे सातही दिवस दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा असणार आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होणा-या प्रगतीमुळे ऑनलाईन व्यवसाय २४तास सुरू असतात.त्यामुळे ऑफलाईन व्यवसाय करणा-या आपली दुकाने आणि आस्थापना सात दिवस सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना हा अधिनियम आजपासुन संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असल्याचे राज्याचे कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर-पाटील यांनी आज विधिमंडळात जाहिर केले.