मुंबईतील, गावठाण कोळीवाड्याचा डीपीमध्ये समावेश करणार!

मुंबईतील, गावठाण कोळीवाड्याचा डीपीमध्ये समावेश करणार!

नागपूर : मुंबईतील गावठाण आणि कोळीवाड्याचा समावेश मुंबईच्या विकास आराखड्यात करण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले.

पनवेल तालुक्यातील हेदुटणे येथील गावठाणावरील बांधकामांचा प्रश्न भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत विचारला होता. या प्रश्नांवरील चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्याचा प्रश्न विचारला. ते म्हणाले की, मुंबईतील गावठाण आणि कोळीवाड्यांची सीमांकन करून यांची स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करून गावठाण आणि कोळीवाड्याचा समावेश मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात करण्यात येईल का? ज्यामुळे घरांचा पुनर्विकास करणे सोपे होईल त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

Previous articleआता सातही दिवस दुकाने सुरू राहणार
Next articleयेळकोळ ….येळकोट..जयमल्हार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here