ऊसतोड कामगार महामंडळावरून धनंजय मुंडे प्रचंड आक्रमक
भाजपा आणि उसतोडा कामगारांसाठी कार्य
करणा-या स्व. गोपीनाथ मुंडे यांचा सरकारने अवमान केल्याचा आरोप
नागपूर : दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळाची सरकारने घोषणा करून तीन वर्ष झाली अद्याप एकाही कामगाराला मदत नाही, महामंडळ हि नाही आणि कार्यालयही नाही हा स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपमान भाजप सरकारने अवमान केला असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
आज प्रश्नोत्तराच्या तासात या बाबतच्या प्रश्नावर मुंडे यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील यांना धारेवर धरत स्व. मुंडे यांचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी केली. या महामंडळास विलंब झाला, आणखी कार्यालय नाही, एकालाही लाभ मिळाला याची कबुली देण्यास मंत्री महोदयांना भाग पाडले. तसेच हे कार्यालय एका महिन्याच्या आत सुरू करण्याचे आश्वासनही मंत्री संभाजी पाटील यांनी दिले ऊस तोडणी कामगारांसाठी स्व. गोपीनाथ मुंडे नावाने भाजपने महामंडळ जाहीर केले होते. तेव्हा आम्ही सरकारचे अभिनंदन केले होते. पण तीन वर्षांपासून महामंडळाचे काम सुरु झालेले नाही. कार्यालय, कर्मचारी, लाभार्थी काहीच तरतूद नाही. ५ डिसेंबरच्या कॅबिनेट बैठकीत महामंडळाचे कार्यालय परळी येथे करण्याचा निर्णय घेतला गेला.
ज्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला वाडी वस्तीत नेले, त्याच गोपीनाथरावांची उपेक्षा भाजपने चालवली आहे. असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आमदार विनायक मेटे यांनीही याबाबत सरकारला चांगलेच धारेवर धरले धनंजय मुंडे आमदार अमरसिंह पंडित आमदार सतीश चव्हाण यांच्यासह अनेक सदस्यांनी हा विषय उपस्थित केला होता