पावसाळी अधिवेशन नागपूरात होणार ?

पावसाळी अधिवेशन नागपूरात होणार ?

नागपूर : नागपूरात होणा-या हिवाळी अधिवेशनात कालावधी विविध प्रश्नावर चर्चेला पुरेसा वेळ मिळत नसल्याने नागपूर मध्ये हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन घेण्याचा विचार सरकारचा असून, यासाठी सर्वांना विश्वासात घेवूनच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती संसदिय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी दिली.

सध्या सुरू असणारे हिवाळी अधिवेशन येत्या २२ रोजी संपत असून, त्याचा कालावधी वाढविण्यात आला नाही. या अधिवेशनात विरोधकांनी सहकार्य केले नाही कामकाजात भाग न घेता अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधकांची मागणी हास्यास्पद आहे असेही बापट म्हणाले. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई मध्ये होईल त्यावेळी नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यावर निर्णय केला जाणार आहे.

Previous articleऊसतोड कामगार महामंडळावरून धनंजय मुंडे प्रचंड आक्रमक 
Next articleनागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here