नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का?

नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का?

 विखे पाटील

नागपूर :  विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर अद्याप चर्चा होणे बाकी असताना आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नसताना सरकार नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का करत आहेअसा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत २२ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाचा समारोप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले कीनागपूर अधिवेशनाचा कालावधी एका आठवड्याने वाढवण्यात यावाअशी मागणी आम्ही २१ नोव्हेंबर  रोजी केली होती. हे अधिवेशन विदर्भात होत असल्याने येथील जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न या अधिवेशनात चर्चिले जाणे अपेक्षित आहे. परंतुहे अधिवेशन दोन आठवड्यातच संपवले जाणार असल्याने विदर्भातील जनतेसह संपूर्ण राज्यातील अनेक समाजघटकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होईल,असेही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.

Previous articleपावसाळी अधिवेशन नागपूरात होणार ?
Next articleआ. आशिष देशमुखांची विरोधकांशी गट्टी जमली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here