आ. आशिष देशमुखांची विरोधकांशी गट्टी जमली !

आ. आशिष देशमुखांची विरोधकांशी गट्टी जमली !

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून नाराजी व्यक्त करणारे  भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आज झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला दांडी मारत दिवसभर विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये रमताण्यात वेळ घालवला.

विधानसभेतील प्रवेश करताना ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची साथ घेतली . त्यानंतर विधानभवन परिसरात त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी गप्पा मारल्या.आज त्याच्या आजच्या संपर्क कार्यक्रमामुळे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला मारलेल्या दांडीमुळे आशिष देशमुख यांच्या विषयी विविध चर्चेला उधाण आले होते.

 

Previous articleनागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का?
Next articleवैद्यनाथ कारखान्याच्या दुर्घटनेतील दोषींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न