नितीन आगे हत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी पाठपुरावा करणार

नितीन आगे हत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी पाठपुरावा करणार!

: विखे पाटील

लोणी‍ : नितीन आगे खून प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण व्यक्तीगत पाठपुरावा करू आणि आगे कुटुंबाला सरकारकडून  संरक्षण मिळवून देवू आशी ग्वाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाला दिली .

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे याची २८ एप्रिल २०१४ रोजी हत्या झाली होती. या घटनेतील आरोपींची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली. साक्षीदार फितूर झाल्यामुळेच आरोपी निर्दोष सुटल्याची भावना आठवले गटाच्या   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची आहे.यासंदर्भात जिल्हा सरचिटणीस रमेश पारधे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या घटनेचा सी.बी.आय.मार्फत पुन्हा तपास करून आरोपीवर कडक कारवाई करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले. फितूर झालेल्या साक्षीदारांना सहआरोपी करावे. नितीन आगे याच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे आशी मागणी देखील शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेत्यांकडे केली.कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनाच आपण मुख्यमंत्र्यांकडे पोहचू आशी ग्वाही देतानाच या घटनेचा तपास सीबीआय मार्फत पुन्हातपास सुरु करतानाच आगे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी व्यक्तीशः पाठपुरावा करू असे स्पष्ट आगे कुटुंबाला संरक्षण देण्याबाबतही सरकारला निर्णय करण्यास भाग पाडू असे आश्वासन शिष्टमंडळाला विखे पाटील यांनी दिले.

 

 

Previous articleसमृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोलनाके ?
Next articleविधानसभा निवडणूकीत भाजपला १६० जागा मिळतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here