विधानसभा निवडणूकीत भाजपला १६० जागा मिळतील

विधानसभा निवडणूकीत भाजपला १६० जागा मिळतील

आ. प्रसाद लाड यांचा दावा

अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोज्वळ चेहरा असून ते राज्याचे दैवत म्हणून काम करत आहेत अशा शब्दात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १६० पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे दैवत म्हणून काम करत आहेत. त्यांचा सोज्वळ चेहरा आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या . मुख्यमंत्री हे नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी झटतात,येत्या दोन वर्षात मुख्यमंत्र्यांना राज्यात मोठा बदल करायचा असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १६० पेक्षा जास्त जागा निवडून येतील असेही वक्तव्य आ. लाड यांनी केले
विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शेकाप, समाजवादी, बहुजन विकास अघाडीने मतदान केल्याचे आ. लाड यांनी सांगितले. पाथर्डीत येथिल हुतात्मा बाबू गेणू समाजवादी विद्यापीठाच्या तिसगाव शाखेच्या सत्कार समारंभात आ. लाड बोलत होते.

Previous articleनितीन आगे हत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी पाठपुरावा करणार
Next articleसरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय ?