सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय ?

सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय ?

सामनातून उध्दव ठाकरेंचा सवाल

मुंबई : ‘‘सरकार खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय’’ असे चारही शहीदांच्या भडकलेल्या चितांची ठिणगी देशातील १२५ कोटी जनतेच्या मनातील लाव्हा बनून विचारीत आहे. गुजरातच्या निवडणुकीनंतर ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवत विजयी ढोल बडविणे हाच देशाभिमान आणि शौर्य असेल तर आमच्या जवानांच्या भडकलेल्या चिता म्हणजे निवडणूक प्रचाराची शेकोटी आहे काय असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून केंद्र सरकारला केला आहे.

काय आहे अग्रलेखामध्ये…….

देशातील सरकार खरोखर खुळचट आणि बुळचट निघाले आहे काय? सरकारचा प्रवास नामर्दानगीच्या दिशेने सुरू झाला आहे काय? सरकारच्या शौर्याचा बुडबुडा फुटला आहे काय? बेडूक फुगला होता आणि त्या बेडकाचे पोट फुटले आहे काय? ढोल वाजवून आनंद साजरा करणाऱ्यांचा ढोल आधीपासूनच फुटका होता काय? असे अनेक प्रश्न फक्त आमच्या मनात घुसळत नसून सामान्य जनतेच्या मनातही उसळत आहेत. हे प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा आमच्यावर मोदीविरोधाचा ठपका ठेवला जातो, पण कश्मीरात काल जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील असाच आक्रोश करून देशवासीयांच्या मनातील भावनांनाच वाट मोकळी करून दिली आहे. एका सैनिकाचे मरण हे देशाचे मरण असते व कोणताही सैनिक युद्धाशिवाय मारला जातो तेव्हा ती सरकारची नाचक्की ठरते. जम्मू-कश्मीरमध्ये आणि सीमेवर अशी नाचक्की गेल्या दोन-तीन दशकांपासून सुरू आहे. विद्यमान सरकारच्या काळात ती थांबेल असे वाटले होते, पण दुर्दैवाने दहशतवादी हल्ले आणि पाकड्यांचे गोळीबारही कमी झालेले नाहीत आणि आमच्या जवानांचे युद्धाशिवाय हुतात्मा होणेदेखील थांबलेले नाही. आपले सरकार बुळचट निघाले आहे. पाकड्यांचे हल्ले रोजच सुरू असून आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून आहे. ‘‘पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्यास सरकार घाबरते आहे काय?’’ असा सवाल पंजाबमधील शहीद शिपाई परगत सिंगच्या वडिलांनी केला आहे. आमचे जवान गस्त घालीत होते तेव्हा

Previous articleविधानसभा निवडणूकीत भाजपला १६० जागा मिळतील
Next articleतब्बल ३५ महामंडळे बंद करणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here