आता भाजपात कोणालाही मुक्त प्रवेश !
हरिभाऊ बागडे यांचा घरचा आहेर
औरंगाबाद : यापूर्वी कार्यकर्त्यांची निवड काटेकोरपणे आणि सर्व बाबी तपासून केली जात होती. मात्र आता तसे होत नाही, अशी तीव्र नाराजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त करत ज्याच्यावर खूनाचा गुन्हा आहे आणि जो वेडा आहे. या दोन व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाला प्रवेश दिला जातो, अशा शब्दात घरचा आहेर दिला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज पक्षाला घरचा आहेर दिला आहे .यापूर्वी कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे आणि सर्व बाबी तपासून केली जात होती. मात्र आता तसे होताना दिसत नाही , अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजपमध्ये एखाद्या व्यक्तिला प्रवेश देताना त्याच्या बाबी तपासल्या जात होत्या. मात्र आज पक्षात ज्याच्यावर खूनाचा गुन्हा आहे आणि जो वेडा आहे. या दोन व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाला मुक्त प्रवेश दिला जातो, अशा शब्दात त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात काम करत असतांना कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे केली जायची. आज परिस्थिती वेगळी आहे, समाज बदलला आहे, त्यानुसार पक्षही बदलला. आता पक्षात कोणालाही घेतले जाते, हे योग्य नव्हे असेही बागडे म्हणाले.