ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८२ टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८२ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध २७ जिल्ह्यांतील जानेवारी-फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ६७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडले. मात्र गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांत केवळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली असून मतमोजणी उद्या २७ डिसेंबर रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान झालेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी: ठाणे- २५, पालघर- ३६, रायगड- ५, रत्नागिरी- ४ सिंधुदुर्ग- १६, जळगाव- ९० नंदुरबार- १३, अहमदनगर- ६६, पुणे- ८९, सातारा- ११, सोलापूर- ६४, सांगली- ५, कोल्हापूर- १० औरंगाबाद- २, बीड- १५७, नांदेड- ३, परभणी- २, उस्मानाबाद- १, जालना- १, लातूर- ५, अमरावती- १२, अकोला- ३, वाशीम- २, बुलडाणा- ४१, वर्धा- २, गोंदिया- २ आणि गडचिरोली- ४. एकूण- ६७१.

Previous articleराष्ट्रवादीच्या लावालाव्या करणाऱ्या वृत्तीमुळे जनतेने घरी बसवले
Next articleखा. राजू शेट्टी यांचे तिस-या आघाडीचे संकेत !