आंदोलन यशस्वी करण्यासाठी भुजबळ समर्थकांची जोरदार तयारी !

आंदोलन यशस्वी करण्यासाठी भुजबळ समर्थकांची जोरदार तयारी !

नाशिक :  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सूड बुद्धीने होत असलेल्या कारवाई विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी येत्या २ जानेवारीला जिल्हा आणि तालुका पातळीवर निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असून, प्रत्येक जिल्हा आणि तालुकावार बैठका घेवून नियोजन करण्यात येत आहे. तर आंदोलनापूर्वी समाज माध्यमांचा आधार घेत मोठ्या प्रमाणात या आंदोलनासाठी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून देण्यात आली आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीकडून चौकशीच्या नावाखाली कारागृहात डांबून ठेवलेले आहे. त्यांच्यावर न्यायालयामध्ये अद्यापही कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाही. मात्र गेल्या २२ महिन्यांपासून शासनाच्या चौकशी यंत्रणेने केवळ चौकशीच्या नावाखाली त्यांना कारागृहात डांबून ठेवले आहे. वास्तविक भुजबळांकडून न्यायालयीन चौकशीला संपूर्णपणे सहकार्य केले जात असतांना सरकारकडून मात्र सूडबुद्धीने कारवाई सुरु असल्याचा आरोप भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून करण्यात आला आहे.

भुजबळांना केवळ आकसापोटी कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व भुजबळ समर्थकांमधील असंतोष अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २ जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांवर निषेध करत शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्यात येणार आहे.२ जानेवारी रोजी होणा-या आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर बैठकांचे घेवून या आंदोलनाचे नियोजन करण्यात येत आहे.या आंदोलनासंदर्भात समाज माध्यमाचा आधार घेवून जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.येत्या मंगळवारी होणा-या या आंदोलनात सर्वपक्षीय भुजबळ समर्थक सहभागी होणार असून, प्रत्येक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन देवून संबंधित कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून देण्यात आली आहे.

Previous article२०१७….मुख्यमंत्र्यांसाठी “अच्छे वर्ष”
Next articleमोपलवार चौकशी अहवाल शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here