हा महाराष्ट्राचा विश्वासघात

हा महाराष्ट्राचा विश्वासघात

काॅग्रेसची टिका

मुंबई : काँग्रेस सरकारच्या काळात पहिले आंतरराष्ट्रीय वित्तिय केंद्र मुंबईत करण्याचा निर्णय करण्यात आला  होता.मात्र केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या लोकसभेत दिलेल्या उत्तराने त्या शक्यतेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. हा महाराष्ट्राचा  विश्वासघात असल्याची टीका प्रदेश  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

जागतिक वित्तिय केंद्र हे गुजरात मध्ये सुरू झाले आहे. त्याचे संपूर्ण कार्यान्वयन आणि पूर्ण  क्षमतेने वापर  होईपर्यंत दुस-या जागतिक वित्तिय केंद्राचा विचार करता येणार नाही असे उत्तर केंद्रिय वित्तमंत्र्यांनी दिले.त्यामुळे गेली  दोन वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जनतेची दिशाभूल करण्याकरिता  उभारलेला फार्स उघडा पडला आहे . असा आरोपही सावंत यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्या इच्छेसाठी  हे करण्याचे पातक घडले असून, त्याला मुंबईची जनता माफ करणार नाही असेही सावंत म्हणाले.

नवी मुंबईतील  नवीन  विमानतळ प्रस्तावित असता जागेची उपलब्धतता असताना सरकारतर्फे पुढे केली  जाणारी कारणे अचंब्यात टाकणारी होती. यापुढे आंतरराष्ट्रीय शेअर बाजार देखील  गुजरातमध्ये सुरू करणय्यात येणार असल्याने मुंबईचे  महत्व कमी करण्याचा हा  प्रयत्न आहे. बुलेट ट्रेनसारख्या अव्यवहार्य प्रकल्पासासाठी राज्य सरकार पैसै देण्यास तयार आहे. मात्र  मुंबईची प्रवासी क्षमता विस्तारण्यास उपयुक्त असा उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द करण्यात आला. हे मुंबईवरील अन्यायाचे प्रतिक आहे याकडे काँग्रेस प्रवक्ते सावंत  यांनी लक्ष वेधले

सनदी अधिकारी मोपलवार यांची पूर्ववत जबाबदारीच्या कामावर ज्या तातडीने नियुक्ती  करण्यात आली त्याबद्दल आश्चर्य व्यकत करताना काँग्रेस प्रवक्ते सावंत म्हणाले, भाजप नेते एकनाथ  खडसे यांच्यासंदर्भात दिड वर्षानंतरही निर्णय जाहीर होत नाही मात्र मोपलवार यांच्यावर काही महिन्यातच पुन्हा जबाबदारी दिली जाते असे सांगत सरकार या अधिका-यावर  विशेष मेहरबान का असा सवालही त्यांनी केला .

Previous article४० हजार कोटी रुपयांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा
Next article१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान सर्व शहरात स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here