४० वर्षे पक्षात असल्याने भाजप व्रत तुटणार नाही !

४० वर्षे पक्षात असल्याने भाजप व्रत तुटणार नाही !

जळगाव : जे लोकांच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही, माझ्या मनात जे आहे, ती मी अजित पवार यांच्या कानात सांगितले आहे. मी ४० वर्ष पक्षात असल्याने माझे भाजप व्रत तुटणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट करून अन्य पक्षात जाण्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला.

भाजपचे नाराज नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना आज खडसे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने ते काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. आ. डॉ सतीश पाटील यांच्या गौरव कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मांडीला मांडी लावून बसले होते. मात्र, या कार्यक्रमाला गिरीश महाजन यांनी दांडी होती.जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालय पटांगणात आ. डॉ सतीश पाटील यांच्या गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेते या उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह,अरुण गुजराती उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत, एकनाथ खडसे यांची उपस्थित राहिल्याने या दोन नेत्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आपल्या भाषणात एकनाथ खडसे म्हणाले की, जे लोकांच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही, माझ्या मनात जे आहे, ती मी अजितदादांच्या कानात सांगितले आहे, मी ४० वर्ष भाजपात आहे, माझे भाजप व्रत तुटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleराष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर आमची बाजू भक्कमपणे मांडू
Next articleखडसे काय बोलले हे सांगितले तर भाजपा नेत्यांची झोप उडेल !