खडसे काय बोलले हे सांगितले तर भाजपा नेत्यांची झोप उडेल !

खडसे काय बोलले हे सांगितले तर भाजपा नेत्यांची झोप उडेल !

जळगाव :  माझ्या मनात काय आहे ते मी अजितदादांच्या कानात सांगितले आहे असे सांगून एकनाथ खडसे यांनी उत्सुकता लावून धरल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला.
एकनाथ खडसे हे माझ्या कानात काय बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यांनी जे मला सांगितले त्यामुळे भाजपा नेत्यांची झोप उडेल, राज्यात खळबळ माजेल, असा दावा अजित पवार यांनी करत आपण हे विनोदाने बोललो असल्याचे सांगितले.

गेल्या ४० वर्षात मला अनेक प्रलोभने मिळाली पण भाजप सोडला नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. जायचे असते तरी कधीच पक्षाला लाथ मारली असती, असेही खडसे म्हणाले. हाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले की,  खडसे यांनी ३० ते ४९ वर्षे त्यांच्या पक्षासाठी मेहनत केली. असे असताना ज्यांच्यासाठी आपण लढलो तेथेच  समस्या निर्माण होते अशी स्थितीही आली. एकीकडे सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची तातडीने चौकशी मार्गी लावली जाते आणि लगेच त्याच पदावर त्यांना संधी दिली जाते. आणि खडसेंच्या कामाला काय फळ मिळाले, असा त्यांनी खडसे यांच्या संदर्भात उल्लेख केला.

Previous article४० वर्षे पक्षात असल्याने भाजप व्रत तुटणार नाही !
Next articleमोजोस बिस्ट्रोच्या मालका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here