गिरीष बापट यांच्या नेतृत्वाखाली  काम करणार

गिरीष बापट यांच्या नेतृत्वाखाली  काम करणार

खा.संजय काकडे

पुणे : पुण्यामध्ये गिरीष बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करणार असल्याचे खा संजय काकडेंनी सांगितले आहे. खा. संजय काकडे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली.त्यानंतर नरमाईची भूमिका घेतलेल्या खा. काकडे यांनी पुण्यात झालेली समेटाची बैठक यशस्वी ठरल्याचे स्पष्ट केले.

पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे किंवा पालकमंत्री गिरीश बापट यांनी मला कोणतीही ताकीद दिली नाही, असे खा.संजय काकडे यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने हरलेल्या जागांवर लक्ष केंद्रीत करायला मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे खा.काकडे म्हणाले. पुण्यात पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करणार असल्याचे खा संजय काकडेंनी नमूद केले आहे. काकडे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. गुजरातमध्ये भाजपाच्या पराभवाचे भाकित केल्याने खा.काकडे यांनी भाजपच्या नेत्यांचा रोष ओढावून घेतला होता.

 

Previous articleमोजोस बिस्ट्रोच्या मालका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Next articleदोषी ठरणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाईचे मुख्मंत्र्यांचे आदेश