दोषी ठरणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाईचे मुख्मंत्र्यांचे आदेश

दोषी ठरणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाईचे मुख्मंत्र्यांचे आदेश

मुंबई : कमला मिल आवारातील आगीच्या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्यासह या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

आज पहाटे मुंबईत घडलेल्या दुर्घटनेत १४ नागरिकांना प्राण गमवावे लागले असून अनेक जण जखमी झाले आहेत. याबाबत तीव्र दु:ख व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. मुंबई महापालिका आयुक्तांकडून या घटनेबाबतची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.

Previous articleगिरीष बापट यांच्या नेतृत्वाखाली  काम करणार
Next articleमुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करा!