शेर कधी घायाळ होत नाही, दुसऱ्याला घायाळ करतो

शेर कधी घायाळ होत नाही, दुसऱ्याला घायाळ करतो

नारायण राणे

सिंधुदुर्ग : शेर कधी घायाळ होत नाही, तो दुसऱ्याला घायाळ करतो. विकास करण्यासाठी राजकीय वजन आणि अभ्यास लागतो.सत्तेत नसूनही माझे राजकीय वजन कायम आहे. कारण मी सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केले.

कोकणात अनेक नेते होऊन गेले, तरीही कोकण मागे का राहिले आहे याचा विचार करणे गरजेचे असून, सत्तेत नसूनही माझे राजकीय वजन कायम आहे. कारण मी सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता आहे.गरिबांच्या हालअपेष्टा मला माहीत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी मी प्रयत्न करणार आहे. मला मंत्रिपदाची आशा मुळीच नाही. कोकणी जनतेचा विकास करणे हे माझे ध्येय आहे. पण आज जनतेला विकास करणारे लोकप्रतिनिधी नकोत, फक्त आश्वासने देणारे मंत्री पाहिजेत, अशी नाराजी राणे यांनी व्यक्त केली.

युती सरकारच्या काळात आमदार झालो. १९९० पासून जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आणि जोमाने काम केले. सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून निर्माण केला. त्याचे यश आपल्याला पहायला मिळत आहे. जिल्ह्यात पाण्याची उणीव भासू नये यासाठी २३० कोटींचा निधी मंजूर करून आणला. मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याचा विकास हाच माझ्या कामाचा केंद्रबिंदू होता, असे राणे यांनी सांगितले. होडावडे ग्रामोन्नती मंडळाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “होडावडा महोत्सव २०१७ “चे उदघाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.

Previous articleमुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करा!
Next articleकमला मिल कंपाऊडच्या आगीची चौकशी फास्ट ट्रॅक न्यायालयात करावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here