मुंबई शहरातील लोकसंख्येवर आळा घालायला हवा
खा.हेमा मालिनी
दिल्ली : मुंबई शहर हे अस्ताव्यस्त वाढत चालले आहे. प्रत्येक शहराला एक मर्यादा असून, तुडूंब भरलेल्या मुंबई शहरातील लोकसंख्येवर आळा घालायला हवा अशी प्रतिक्रिया भाजप खासदार हेमा मालिनी यांनी दिली आहे.
कमला मिल कम्पाऊंड आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. यावर प्रतिक्रिया देताना खा. हेमा मालिनी यांनी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. मुंबई शहर वाढत दुसऱ्या शहरांपर्यंत पोहोचले आहे. एक शहर संपत नाही तर दुसरे शहर सुरु होते. त्यामुळे मुंबई कुठे संपते हेच कळत नाही. मुंबईची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सर्वात आधी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायला हवे. शहराला काही मर्यादा, काही बंधने आहेत. त्यानंतर त्या शहरात कोणालाही परवानगी दिली जाऊ नये. त्यांना दुसऱ्या शहरात जाऊ द्यावे असेही हेमा मालिनी म्हणाल्या.