कोल्हापूर पासपोर्ट वितरणात देशात प्रथम
नवी दिल्ली : देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने सुरु झालेल्या नवीन पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाच मध्ये राज्यातील तीन शहर असून पिंपरी चिंचवड़ दुसऱ्या तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर आहे अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना आहे.
देशात २५१ केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून यातील पहिल्या टप्यात सुरु करण्यात आलेल्या देशातील ५९ केन्द्रा पैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहर पहिल्या पाच मध्ये आहेत .
कोल्हापुरातून २१ हजार ९५ पासपोर्टचे वितरण
कोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून २१ हजार ९५ पासपोर्ट चे वितरण करण्यात आले,देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड़ पासपोर्ट वितरण केंद्रातून २० हजार ८३ तर औरंगाबाद केंद्रातून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले . कर्णाटकातील म्हैसुरु तिसऱ्या क्रमांकावर असून या केंद्रातून १६ हजार ४४६ आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या भुज (गुजरात) केंद्रातून १५ हजार २८१ पासपोर्ट वितरित करण्यात आल्याची माहिती मुळे यांनी परीचय केंद्रास दिली आहे