अग्नितांडव : तीन स्वतंत्र गुन्हे दाखल
मुंबई : मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पबला लागलेल्या आग प्रकरणी अखेर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीमधील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये १४ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे तर; अनेक जण जखमी झाले आहेत. एमआरटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी, मोजोसचे संचालक युग पाठक आणि ड्यूक थुली तसेच वन अबोव्हचे संचालक क्रीपेश संघवी, अभिजीत मानकर आणि रघुवंशी मील पी २२ चे संचालक शैलेंद्र सिंघ यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त एस जयकुमार यांनी दिली आहे.