हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावणार

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावणार

पुणेकरांना सरकारची नव्या वर्षाची भेट

मुंबई : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक खाजगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (DBFOT) या तत्त्वावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पूढील प्रमाणे –

१) संरक्षित वन्य क्षेत्रातून स्वखुशीने स्थलांतरित होणाऱ्यांना बाजारभावाच्या चार पट जमीन मोबदला मिळणार.

२ ) औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित जमिनीच्या वापर बदलाबाबतच्या धोरणास मान्यता.

३ ) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक खाजगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (DBFOT) तत्त्वावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता.

४ ) औषधांसह अनुषंगिक वस्तूंची शासनाने विहित केलेल्या दरकरारांनुसार खरेदी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास परवानगी देण्यासह संचालनालयाच्या दरकरारांना मुदतवाढ देण्याचा निर्णय.

Previous articleसमाज माध्यमातुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार
Next articleभुजबळ समर्थकांकडून राज्यभरात जोरदार निदर्शने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here