राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मंत्रालयात निदर्शने

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मंत्रालयात निदर्शने

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद आज मंत्रालयात उमटले. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली.

सायंकाळी ५:३० च्या सुमारास पोलीसांचा कडक बंदोबस्त असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करीत गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे आणि हातात सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे फलक उंचावत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दलित विरोधी मुख्यमंत्री चले जावच्या घोषणा
राष्ट्रवादी काॅर्गेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या.त्यानंतर या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

Previous articleप्रकाश आंबेडकर यांची उद्या महाराष्ट्र बंदची हाक 
Next articleभीमा कोरेगाव प्रकरण हा पूर्वनियोजित कट