भीमा कोरेगावच्या घटनेला समाज माध्यमे जबाबदार

भीमा कोरेगावच्या घटनेला समाज माध्यमे जबाबदार

गृहराज्यमंत्र्यांचा दावा

मुंबई : भीमा कोरेगाव येथे घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र हा प्रकार समाज माध्यमाच्या चुकीच्या माहितीमुळे घडला असल्याचा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री ( ग्रामिण ) दीपक केसरकर यांनी केला आहे.

वढु बुद्रुकमध्ये संपूर्णतः शांतता असून, काही लोकांवर अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केल्याचा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर टाकला गेल्याने येथिल प्रकार घडला असल्याचे केसरकर म्हणाले.येथे बाहेरच्या लोकांनी बॅनर लावले असल्याचे केसरकर . या गोंधळामध्ये मृत झालेला युवक हा दलित असल्याचीही अफवा समाज माध्यमातून फिरल्यामुळे स्थिती गंभीर झाली असल्याचे केसरकर यांनी सांगितले. या घटनेत दोन्ही गटांकडून दगडफेक झाली असल्याचे सांगत संबंधित सर्व दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.  भीमा कोरेगावला दलित युवकाचा मृत्यू झाला अशी अफवा पसरवण्यात आली मात्र हा मृत दलित नसल्याचे केसरकर यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव मधिल घटनेच्या निषेधार्थ आज राज्यात बंद पाळण्यात आला या दरम्यान पोलीस प्रशासनाकडून कुठेही बळाचा वापर करण्यात आला नसल्याचे स्पष्ट करीत भिमा कोरेगावला यावर्षी २०० वर्ष पूर्ण झाले असल्याने या वर्षी तीन लाख लोक येथे आले होते. मात्र चोख बंदोबस्तामुळे कार्यक्रमस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

महाराष्ट्र बंदच्या काळात औरंगाबादला दीड हजाराचा जमाव आल्याने पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून  प्लास्टिक गोळ्यांचा वापर करावा लागला असल्याचे केसरकर यांनी सांगितले. या घटनेत पोलीस देखील जखमी झाल्याचे केसरकर म्हणाले. चंद्रपूरला माजी आमदार शाम घुडे यांच्या कार्यालयावर हल्ला झाला असून, नांदेडला पोलिसांच्या गाडया फोडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पवई पोलीस स्थानकात दगडफेक झाल्याने एक पोलीस निरिक्षक आणि दोन पोलीस शिपाई जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.  घाटकोपर, चेंबूर, छेडानगर, विक्रोळी, रमाईनगर या भागासोबत दादर, भोईवाडा, वरळी काही ठराविक युवकांच्या समूहांनी बंद करण्यासाठी घोषणाबाजी केली आणि या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाल्याचे केसरकर म्हणाले. काही अपवाद वगळता राज्यात शांतता असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्र बंद मागे !
Next articleमंत्रालयात शुकशुकाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here