विघातक शक्तींकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न

विघातक शक्तींकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न

मुंबई : भीमा कोरेगावच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून राज्यात तणावाचे वातावरण आहे . राजकीय लाभ घेण्यासाठी काही विघातक शक्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप करतानाच असा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे असे  वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .

हिंदी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते .ज्या वेळी कोणतेही मुद्दे नसतात त्यावेळी अश्या प्रकारे वाद निर्माण केले जातात. शाहू ,फुले आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे असे आपण म्हणतो पण काही लोकांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची जनता जातीयवादाला थारा देणार नाही असा विश्वास व्यक्त करत त्यांनी  जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले .

बाहेरील शक्ती राज्यात येऊन जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत . मात्र या शक्तीचा प्रयत्न आपण हणून पडला पाहिजे.त्यांना या नाजूक विषयाचा लाभ घेण्यापासून आपणच रोखले पाहिजे असे ही मुख्यमंत्री म्हणाले . राज्यातल्या जनतेला तणाव नको तर विकास हवा आहे .त्या दृष्टीने नागरिकांनी आचरण करावे .लवकरच या प्रकरणाची​ न्यायालयीन ​ चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई होईल​. या प्रकरणाच्या शेवटा पर्यंत सरकार  जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले .

Previous articleमंत्रालयात शुकशुकाट
Next article९० बसेसची तोडफोड;४ चालक जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here