९० बसेसची तोडफोड;४ चालक जखमी
मुंबई : महाराष्ट्र बंदच्या काळात मुंबईत धावणा-या एकूण ३ हजार ३३७० बसेस पैकी ३ हजार २०८ बसेस रस्त्यावर धावत होत्या त्यापैकी विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीत ९० बसेसची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या असून, यामध्ये ४ बस चालक काचा लागून जखमी झाले आहेत.
आज दिवसभरात एकूण ३ हजार ३७० बसेस पैकी ३ हजार २०८ बसेस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५२ बसेसची तोडफोड करण्यात आली. यामध्ये ४ बसचालक काचा लागून जखमी झाले आहेत.
जखमी झालेल्या बसचालकांची नावे पुढील प्रमाणे-
आसारजी विश्वनाथ गरजे (डेपो- प्रतीक्षा नगर, ठिकाण – जिजामाता नगर, बसमार्ग १७२), अरुण गणपत मिरगळ , ( डेपो – मध्य मुंबई, ठिकाण- वरळी नाका , बसमार्ग १५४), नितिन कमलाकर वाघमारे ( डेपो – मजास, ठिकाण- पवई, बसमार्ग – ४९६ ), शशिकांत गणपत गोसावी , ( डेपो -सांताक्रुझ बसमार्ग-मोतीलाल नगर- २२९ )