भीमा कोरेगावमध्ये याच वर्षी गालबोट का लागले ?

भीमा कोरेगावमध्ये याच वर्षी गालबोट का लागले ?

शरद पवार यांचा सवाल

मुंबई : गेली अनेक वर्षांहून अधिक काळ भीमा कोरेगावध्ये दरवर्षी हजारो लोक जमल्याचे बघत आलो आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येत असतात . शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या कार्यक्रमात यंदा असे काय झाले की त्याला गालबोट लागले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेत उपस्थित केला.

भीमा कोरेगाव येथिल घटनेला दोनशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्त लाखोंच्या संख्येने येथे जनता येणार होते याची कल्पना असतानाही प्रशासनाने कसलीच दक्षता घेतली नसल्याचे या घटनेवरून दिसते असा आरोपही पवार यांनी केला. आता झाले गेले विसरून जाऊन सर्वांनी एकसाथ राहण्याची गरज आहे, असे आवाहन पवार यांनी केले.अनेक वर्षांपासून गावातील सर्व जाती धर्माचे लोक सलोख्याने राहतात. या सोहळ्यानिमित्त येणाऱ्या लोकांची सेवाही करतात . दुर्दैवाने एक महिन्यापूर्वी काही विशिष्ठ समुदायाचे लोक येथे येऊन गेले. दलित नेत्यांच्या सभेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. लाखो लोकांच्या संख्येने येथे जमलेल्या जनतेवर दगडफेक करतात. राज्य सरकारने वेळीच कारवाई केली असती आणि लक्ष दिले असते तर वातावरण बिघडले नसते. सरकारने या घटनेची चौकशी करण्याची घोषणा केली आहे . केंद्र सरकारकडूनही याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे आता जे झाले ते झाले. दोन्ही समाजातील लोकांनी आता एकसाथ राहण्याची आवश्यकता आहे.

Previous articleमुख्यमंत्री विरोधात असतील तरच निवडणूक लढणार !
Next articleमुख्यमंत्री…. सोशल मिडीयावरील विकृत प्रचार थांबवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here