मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खुर्ची धोक्यात ?
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या प्रमुखपदावरून हटवून केंद्रात नेण्याच्या हालचाली सुरू असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या प्रमुखपदावरून हटवून केंद्रात नेण्याच्या हालचाली सुरू आहेत, पटोले यांनी आज नागपूरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याबाबत भाजपातंर्गत हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. मराठा मोर्चा आणि भीमा कोरेगावमधिल घटनेमुळे केंद्रातील नेते नाराज आहेत.फडणवीस यांच्याबाबत पक्षातील नेत्यांची नाराजी वाढत चालल्याची चर्चा आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे, भाजपचे आमदार आशिष देशमुख, भाजपचे आमदार विकास कुंभारे यांच्यासह अनेक नेते, आमदार नाराज आहेत. आशिष देशमुख यांनी सुरूवातीला पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली होती असेही सूत्रांचे म्हणणे आहे.










