राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला

राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला

मुख्यमंत्री

मुंबई : विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून, त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक उमदा नेता आपण गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनाने एक अजातशत्रू नेता आपल्यातून निघून गेला अशा शब्दात काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भावना व्यक्त केली.

विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांनी १९८६ साली ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९८७ साली ते ठाण्याचे महापौरही झाले. १९९२ पासून ते चारवेळा विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेले होते.

अल्पपरिचय

जन्म ८ नोव्हेंबर १९४९

१९८६ काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. वसंत डावखरे ठाण्याचे महापौर  झाले.

१९९२ पासून सतत चार वेळा विधानपरिषदेवर ते निवडून गेले आहेत.

१९९८ मध्ये ते विधानपरिषदेचे उपसभापतीपद झाले. १३ जुलै २०१० ला त्याची विधानपरिषद उपसभापतीपदी फेरनिवड झाली.ठाणे व कल्याण लोकसभा त्यानी लढवली.

शरद पवार यानी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी काँग्रेस सोडून डावखरेंची राष्ट्रवादीत प्रवेश केला.

२०१० साली ते विधानपरिषदेवर बिनविरोध निव़डून गेले.

अंतिम दर्शन: स. ११ ते दु. २ गिरिराज हाइट्स , हरी निवास , ठाणे
अंतिम संस्कार: दुपारी ३ वाजता होणार आहेत.

Previous articleवसंत डावखरे यांचे निधन
Next articleभीमा कोरेगाव घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here