भिडे गुरूजींच्या विरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही

भिडे गुरूजींच्या विरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही

खा.उदयनराजे भोसलेंचा घरचा आहेर

दिल्ली : संभाजी भिडे गुरुजी हे वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल मनात आदर आहे आणि आदर राहाणारच. त्यांनी लहान मुलांचे संघटन केले. त्यांचा भीमा कोरेगाव प्रकरणाशी कसलाही संबंध नसून, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही, असे सांगत सातारचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिला.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविषयी मनात आदर असून, त्यांच्याविषयी बोलण्याची कोणाची लायकी नाही, अशी प्रतिक्रिया खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. हिंसाचारानंतर राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली होती. दलित संघटनांनी महाराष्‍ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे नागरिकांची माथी भडकतील, असे वक्तव्य कोणीहि करू नये, असे आवाहन खा. भोसले यांनी केले .भिडे गुरुजी हे वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल मनात आदर आहे आणि आदर राहाणार. त्यांनी लहान मुलांचे संघटन केले. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध पण नाही. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही असेही त्यांनी सांगितले.

Previous articleभीमा कोरेगाव घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा
Next articleथांबण्याची सवय नसल्याने लवकरच मंत्रिमंडळात असेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here