वन अबाव्हच्या मालकांचा ठावठिकाणा कळवा “एक लाख” मिळवा

वन अबाव्हच्या मालकांचा ठावठिकाणा कळवा “एक लाख” मिळवा

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील पबला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. हि घटना घडून आठ दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरी या घटनेला कारणीभूत ठरलेल्या वन अबाव्ह पबच्या तीन आरोपी संचालक पोलीस पकडू शकले नाहीत. तर आज मुंबई पोलीसांनी या तीन आरोपींना पकडून देणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मुंबई पोलिसांनी या तीन आरोपींचे फोटो प्रसिद्ध करीत वरील आवाहन केले आहे. २८ डिसेंबरला रात्री उशीरा ही दुर्घटना घडून गेल्यानंतर आज आठ दिवसांनंतरही हे तीन आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांना अद्याप पकडू शकलेले नाहीत.वन अबाव्ह बारचे तीन आरोपी संचालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,हे तिघेही आरोपी फरार आहेत. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांकडून त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली आहे.

Previous articleवाळू लिलावातील २५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या विकासासाठी मिळणार
Next articleमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जातीय अराजक व विनाशाच्या खड्डयात !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here