मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जातीय अराजक व विनाशाच्या खड्डयात !
मुंबई : भीमा-कोरेगाव येथिल घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामनाच्या अग्रलेखातून लक्ष्य केले आहे.कुठे दलित समाज ‘बंद’ पुकारीत आहे तर कुठे हिंदुत्ववादी संघटना मोर्चे काढत आहेत. एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र समृद्धीच्या महामार्गाने जाताना दिसत नसून, तो जातीय अराजक व विनाशाच्या खड्डयात पडताना दिसत आहे अशा शब्दात त्यांचा समाचार घेण्यात आला असून, राज्य मनाने दुभंगले आहे. १८१८ मध्ये भीमा-कोरेगावात पेशव्यांचा पराभव झाला. तो पराभव छत्रपतींच्या राज्याचा होता. फडणवीस, मग आता तरी वेगळे काय झाले आहे? उथळ राजकारणाला उकळी फुटली आहे, सावधान असा इशाराही आजच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
काय आहे अग्रलेखात-
महाराष्ट्रात सर्व काही आलबेल आहे असे ज्यांना वाटते ते मूर्खांच्या नंदनवनात विहार करीत आहेत. तिसऱ्या दिवशीही काही ठिकाणी आगी पेटल्या, तर काही ठिकाणी आधीच पेटवलेल्या आगीचा धूर निघत आहे. दगडफेक आणि रस्त्यावर येऊन वाहतुकीचा खोळंबा करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला ‘बंद’ शांततेत पार पाडला असता तर एक पुढारी म्हणून त्यांचे वजन नक्कीच वाढले असते. तसे झाले नाही. उलट बौद्ध समाजातील काही भडक डोक्याचे लोक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अधिकच दिशाहीन झाले आहेत व ते आता नक्षलवाद्यांची भाषा बोलू लागले आहेत. कोल्हापूरच्या रुकडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना काही भडक डोक्याच्या लोकांनी केली. त्यातून त्या भागात तणाव वाढला आहे. कुठे दलित समाज ‘बंद’ पुकारीत आहे तर कुठे हिंदुत्ववादी संघटना मोर्चे काढत आहेत. एकंदरीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र समृद्धीच्या महामार्गाने जाताना दिसत नसून तो जातीय अराजक व विनाशाच्या खड्ड्यात पडताना दिसत आहे. या क्षणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत. कारण प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आणि सुव्यवस्थेचा आहे. ‘‘भीमा-कोरेगावची दंगल