नेत्याचा दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करा

नेत्याचा दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करा

उध्दव ठाकरे

मुंबई : कोणत्याही नेत्याचा दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी कारवाई करायला हवी अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.कमला मिल मधिल दुर्घटनेले जबाबदार असणा-या पब मालकांना पकडण्यासाठी पोलीसांना बक्षीस जाहीर करावे लागते हा कहरच झाला असे सांगून, त्यांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी कोणाचाही दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. शिवसेना पक्ष त्यांच्या सोबत आहे.पण ते करताना बांधकाम अधिकृत आहे का अनधिकृत याची खातरजमा करावी असेही उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कमला मिल येथिल दुर्घटनेच्या एक दिवस आधी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे कमला मिल इथे गेले होते. यावरुन विरोधकांनी टीकाही केली होती. याला आज शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी उत्तर दिले. हे जर सांगता मग मंत्रालयाला आग लागली होती त्या आधी मुख्यमंत्रीही तिथे गेले होते. त्यामुळे असे आरोप करणे योग्य नसल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.कमला मिल प्रकरणात पब मालकांना पकडण्यासाठी पोलीसांना बक्षीस जाहीर करावे लागते हा कहरच झाला. इनाम जाहीर करायला ते दहशतवादी आहेत का असा सवाल करीत, या पबचे मालक सापडत नसतील तर गृहखाते  काय करत आहे अशी टिकाही त्यांनी केली.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जातीय अराजक व विनाशाच्या खड्डयात !
Next articleमुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांची येत्या सोमवारी “स्वयंपुनर्विकास अभियान” परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here