मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांची येत्या सोमवारी “स्वयंपुनर्विकास अभियान” परिषद

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांची येत्या सोमवारी “स्वयंपुनर्विकास अभियान” परिषद

मुंबई : मुंबईतील वर्षानुवर्षे रखडलेल्या पुनर्विकासालाचा चालना देण्यासाठी आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेची महत्वाकांक्षी स्वयंपुनर्विकास योजना नव्या रूपात आणि अधिक लवचिकपणे राबवली जात असून, मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना विकासक बनवून त्यांच्या पुनर्विकासाला आर्थिक बळ देण्याबरोबरच तांत्रिक सहाय्य करणा-या स्वयंपुनर्विकास क्रांतीपर्वाला चालना देण्यासाठी येत्या सोमवारी ८ जानेवारीला मुंबईतील गृहनिर्माण संस्थांची विशेष स्वयंपुनर्विकास अभियान परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बॅकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात येत्या सोमवारी ८ जानेवारीला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चालणा-या या परिषदेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्ये हस्ते होणार आहे.या परिषदेला सहकारमंत्री सुभाष देशमुख , गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आ. आशिष शेलार, बॅकेचे संचालक आणि आमदार प्रसाद लाड, रेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, बॅकेचे संचालक आ. सुनिल राऊत, सिध्दार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, बी.डी. पारले बॅकेचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम दळवी, वास्तू विशारद निखील दिक्षित, म्हाडाचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर प्रभू आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई बॅकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

मुंबईतील गृहनिर्माण संस्थांसाठी हि परिषद दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरेल असे बॅकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितले. या महत्वपूर्ण परिषदेला मुंबईतील गृहनिर्माण संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. दरेकर यांनी केले आहे. गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास म्हटला की, विकासकाच्या मनमानीसह प्रकल्प रखडण्याच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शिवाय रहिवाशाने, संस्थांनी आपली घरे आणि परिसर विकासकाच्या हवाली केला की,संबंधित प्रकल्पाचे भविष्य हे विकासकाच्या हातात असल्याने सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांचा सामोरे जावे लागते.पुनर्विकास करताना विकासाची मनमानी होवून त्याच्या म्हणण्याप्रमाणे इमारतीची रचना , तो देईल तेवढेच क्षेत्रफळ, तो देईल तेवढाच काॅर्पस फंड या परंपरेला छेद देण्यासाठी मुंबई बॅकेची स्वयंपुनर्विकास योजना मुंबईतील झोपडीधारकांना वरदान ठरणार असून, या योजनेमुळे वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार आहे. शिवाय प्रकल्प वेळेत पूर्ण होवून, इमारतीचे बांधकाम दर्जेदार होतानाच सामान्य मुंबईकरांच्या हिताचे रक्षण होणार असल्याचे आ. दरेकर यांनी सांगितले.

मुंबई बॅकेच्या या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना होवून त्यांना अशा प्रकल्पामधून मोठी घरे प्राप्त होणार आहेत.तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शाश्वती असल्याने अतिरिक्त एफएसआय विक्रीतून मिळणारा सर्व नफा विकासकाऐवजी गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांना मिळणार असल्याने बॅकेची हि योजना मुंबईतील सर्वसामान्य जनतेला मोठे वरदान ठरणार असल्याने या परिषदेला मुंबईतील गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन बॅकेचे अध्यक्ष आ. दरेकर यांनी केले आहे.

Previous articleनेत्याचा दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करा
Next articleभिमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here