दंगली घडवणारे बाहेरचे कोण ? सरकारने त्यांचा शोध घ्यावा

दंगली घडवणारे बाहेरचे कोण ? सरकारने त्यांचा शोध घ्यावा

शरद पवार यांची मागणी

अकलूज : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा लक्ष्य केले आहे.बाहेरच्या लोकांनी हे कृत्य केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात, भीमा कोरेगावचे ग्रामस्थही तेच सांगतात. त्यामुळे दंगली घडवणारे बाहेरचे नेमके कोण लोक आहेत. हे सरकारने शोधून काढावे अशी मागणी आज शरद पवार यांनी केली येथे आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

पवार यांनी आपल्या भाषणात केंद्रातील सरकारवरही टिका केली. आम्ही पिकवण्याऱ्यांचा विचार करतो, पण हे खाणाऱ्यांचा विचार करतात.त्यांनी आपले हे धोरण बदलले पाहिजे असे सांगतानाच पिकवणारा जगला तर खाणारा जगेल, बँकांचा तोटा भरून काढायला केंद्र सरकारने ८० हजार कोटी भरले पण शेतकऱ्याला कर्जमाफी देताना हे सरकार मात्र टाळाटाळ करते. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज असल्याचे वक्तव्यही शरद पवार यांनी केले. कर्जमाफीच्या मुद्यावरून पवार यांनी संभाजी भिडे यांचे नाव न घेता टोला लगावला. काही लोक म्हणतात ४० टन ऊस घेणाऱ्यांना कशाला पाहिजे कर्जमाफी, यावरूनच त्यांना शेतकऱ्यांबद्ल असणारा कळवळा समजतो. भिडे यांनी कर्जमाफीवर टीका केली होती त्यालाही पवारांनी आजच्या भाषणातून उत्तर दिले.

Previous articleअशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदी कायम
Next articleकोकणची राख करणारा आणि गुजरातेत रांगोळी काढणारा विकास खपवून घेणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here