कोकणची राख करणारा आणि गुजरातेत रांगोळी काढणारा विकास खपवून घेणार नाही
उध्दव ठाकरे यांनी ठणकावले
नवी मुंबई : मुंबईतील अर्थिक केंद्र आणि बुलेट ट्रेन गुजरातमध्ये नेणा-यांनी सत्यानाश करणारी रासायनी प्रकल्प मात्र आमच्या माथी मारले आहेत. जैतापूर प्रकल्पा पाठोपाठ राजापूरमध्ये आता रिफायनरी उभी राहत आहे. त्यामुळे कोकणच्या सौंदर्याचा नाश होणार आहे. मेक इंडियाच्या या धोरणामुळे कोकणची राख होणार असून, गुजरातमध्ये मात्र विकासाची रांगोळी काढली जाणार आहे. असा विकास शिवसेना कदापिही सहन करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज येथे केंद्र सरकारला ठणकावले.
वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सचिनदादा धर्माधिकारी यांना नव उद्योग निर्माण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे ८० हजार अनुयायी उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना उध्दव ठाकरे यांनी सरकारच्या सत्यानाश करणा-या विकास धोरणाचा जोरदार समाचार घेतला. मेक इन इंडियाच्या नावाखाली आपल्याला सध्या विकासाची स्वप्ने दाखविली जात आहेत. जे चांगले आहे, ते सर्व भकास आणि नष्ट होणार असेल तर याला विकासाची स्वप्न म्हणता येणार नाही. इस्त्रायलने वाळवंटामध्ये शेती केली असा उल्लेख जगात होत आहे. जर आपला विकास हा चांगल्या गोष्टींचा सत्तानाश करणार असले तर आपलाही उल्लेख होईल, महाराष्ट्राने हिरवळीचे वाळवंट केले. हे सर्व थांबायचे असेल आणि कोकणचा विकास खNया अर्थाने करायचा असेल तर राजकीय जोडे बाहेर काढून तुमच्याबरोबर येण्याची माझी तयारी आहे, असेही प्रतिपादन उध्दव ठाकरे यांनी केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राहुलदादा धर्माधिकारी, शिवसेना आमदार अनिल परब, आमदार भाई जगताप, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, गटनेते द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक शिवराम पाटील, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, किशोर धारीया, बीव्हीजीचे व्यवस्थापकीय संचालक हनुमान गायकवाड आदि उपस्थित होते.
निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना सर्वजण दिपस्तंभ म्हणत. महासागरात भरकटलेल्या बोेटींना किंवा जहाजांना दिशा दाखविण्याचे काम दिपस्तंभ करतो. मात्र नानासाहेब हे महासागरालाचा दिशा दाखविणारे दिपस्तंभ होते, असे उद् गार उध्दव ठाकरे यांनी काढून त्यांच्या पश् चात आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांनी समाजसेवेचा जो वसा पुढे चालू ठेवला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतूक केले. नानासाहेबांची तिसरी पिढी समाजाच्या सेवेत आहे. ते सर्वजण नानासाहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जात आहेत, आमचीही तिसरी पिढी राजकारणात आहे. दोन्ही कुटूंबाचे कार्य एकच असताना मला कायम घराणेशाहीच्या टिकेचा सामना करावा लागला. येथे जरी तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले असले तर आमच्या नशिबात आणि मार्गात नेहमीच बोरी-बाभळीचे काटे उभा राहिले, असे उध्दव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जैतापूरचा अणू ऊर्जा प्रकल्प, राजापूरची रिफायनरी यांच्यासारखे सत्यानाश करणारे एक-एक प्रकल्प कोकणात आले तर माझे कोकण राहिल का, करणारे निघून जातील परिणाम आम्ही का भोगायचे, असा संताप यावेळी उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करून पर्यावरणाला घातक असलेले काही प्रकल्प तुमच्याकडेही घेऊन जा, अशी जोरदार चफराक लगावली.उद्योग उभा करण्यासाठी ध्येय, निश्चिय आणि चिकाटी या बाबी महत्त्वाच्या आहेत. नोक-या निर्माण करणारे उद्योग निर्माण करण्यासाठी अभ्यासुवृत्तीची गरज आहे. अभ्यास नसेल तर संयम येणार नाही आणि आपण आपले निश्चित ध्येय गाठू शकणार नाहीत. आज मला येथे सन्मानित करण्यात आले तो गौरव माझा नसून मी घडविलेल्या सर्व उद्योजकांचा आहे, असे प्रतिपाद सचिनदादा धर्माधिकारी यांनी केले. ग्लोबन कोकण महोत्सवामध्ये आज आयोजित करण्यात आलेला हा पुरस्कार सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. नानासाहेबांनी कोट्यवधी लोकांना अंधाराकडू प्रकाशाकडे नेले, ते कार्य सचिनदादा करीत आहे. तसेच शिवसेनाप्रमुखांचीही तिसरी पिढी समाजाच्या सेवेत उतरली आहे. त्यामुळे हा सोहळा शक्ती आणि भक्तीचा योगायोग ठरला आहे.कोकणावर ईश्वरी शक्तीची कृपादृष्टी आहे. कोकणासारखा गणेशोत्सव जगात कुठेच साजरा होत नाही. फक्त मासेच नाही तर कोकणातील प्रत्येक वस्तु ही जागतिक बाजारपेठेमध्ये स्थान निर्माण करू शकणारी आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यावेळी म्हणाले.