शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक आणि मराठवाड्याच्या प्रश्नासाठी हल्लाबोल यात्रा 

शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक आणि मराठवाड्याच्या प्रश्नासाठी हल्लाबोल यात्रा 

धनंजय मुंडे

हिंगोली :  शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक आणि मराठवाड्याच्या विविध प्रश्नासाठी १६ जानेवारी पासून मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

हल्लाबोल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आज मुंडे हिंगोली येथे आले होते. पक्ष कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल यात्रेची माहिती दिली.कर्जमाफीची अंमलबजावणी नाही, बोंडअळीने कापूस पीकाच्या झालेल्या नुकसानीला मदत नाही, शेतमालाला हमीभाव सरकार दयायला तयार नाही, कायदा व सुव्यवस्था ढासाळली आहे.वीजेचा प्रश्न आणि मराठवाडयातील समस्यांकडे सरकारचे होत असलेला दुर्लक्ष, वाढती महागाई, बेरोजगारी या विरोधात आम्ही सरकारविरुद्ध पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहोत.या हल्लाबोल यात्रेची सुरुवात १६ जानेवारीपासून तुळजापूर येथून होत आहे. दहा दिवसांच्या या यात्रेत दहा दिवसामध्ये दररोज ३ या प्रमाणे २८ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडयाच्या आठही जिल्हयामध्ये दिवसाला तीन सभा घेतल्या जाणार आहेत. तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाने या हल्लाबोल यात्रेची सुरुवात केली जाणार आहे.

या हल्लाबोल यात्रेत १६ जानेवारीला उस्मानाबाद जिल्हयात सकाळी ११ वाजता तुळजापूर, दुपारी ४ वाजता उमरगा, सायंकाळी ७ वाजता उस्मानाबाद, १७ जानेवारी सकाळी ११ वाजता भूम, दुपारी ४ वाजता पाटोदा, सायंकाळी ७ वाजता बीड, १८ जानेवारीला बीड जिल्हयात सकाळी ११ वाजता गेवराई, दुपारी ३ वाजता माजलगाव, सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई, १९ जानेवारीला लातूर जिल्हयात सकाळी ११ वाजता औसा, दुपारी ३ वाजता उदगीर, सायंकाळी ७ वाजता अहमदपूर, २० जानेवारीला सकाळी ११ वाजता लोहा, दुपारी ३ वाजता गंगाखेड, सायंकाळी ७ वाजता परळी, २१ जानेवारीला नांदेड जिल्हयात दुपारी १ वाजता उमरी, सायंकाळी ५ वाजता माहुर, २२ जानेवारीला हिंगोली, परभणी जिल्हयात सकाळी ११ वाजता हिंगोली, दुपारी ३ वाजता वसमत, सायंकाळी ७ वाजता परभणी, २३ जानेवारीला जालना, परभणी जिल्हयात सकाळी ११ वाजता पाथरी, दुपारी ३ वाजता सेलू, सायंकाळी ७ वाजता परतूर, २४ जानेवारीला जालना जिल्हयात सकाळी ११ वाजता घनसांगवी, दुपारी ३ वाजता बदनापूर, सायंकाळी ७ वाजता भोकरदन येथे सभा होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

या हल्लाबोल यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष श्री सुनिल तटकरे, पक्षाचे नेते आणि विधीमंडळ पक्षनेते  अजित पवार, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महिला अध्यक्षा सौ चित्राताई वाघ, युवक अध्यक्ष संग्राम कोते, सर्व आमदार, खासदार आदी महत्वाच्या नेत्यांसह आणि मराठवाडयातील पक्षाचे सर्व आमदार आणि विविध आघाडयांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या हल्लाबोल यात्रेचा समारोप हा औरंगाबादमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेने ३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचेही ते म्हणाले.राज्यातील अशांत परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार आहे, सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोपही त्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात केला.

पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीस  मुंडे यांच्यासह माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, विधान परिषद सदस्य आ.रामराव वडकुते, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, हिंगोली जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, महिला आघाडीच्या राष्ट्रीय पदाधिकारी सोनालीताई देशमुख, हिंगोलीचे उपनगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, सौ.सुनिता टाले, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, माजी नगराध्यक्ष अनीताताई सुर्यतळ, शहर अध्यक्ष सय्यद जावेद राज, जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे, बी.डी.बांगर आदी उपस्थित होते. या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. बैठकीस जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकोकणची राख करणारा आणि गुजरातेत रांगोळी काढणारा विकास खपवून घेणार नाही
Next articleकायदा व सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री अपयशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here