गाडगे आणि झाडू बांधून मंत्रालयासमोर आंदोलन
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचारातल्या दोषींना अटक करावी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आरपीआयच्या खरात गटाचे सचिन खरात यांनी आज गळ्यात गाडगे आणि पाठीला झाडू बांधून मंत्रालयासमोर अनोखे आंदोलन केले .
मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मंत्रालयात अभ्यागतांची मोठी गर्दी असल्याने या कामात मंत्रालयात बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीसही गर्दीला आवरण्याथ व्यस्त होते. सचिन खरात यांनी अचानक मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गळ्यात गाडगे आणि कंबरेला झाडू बांधून मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे असल्याची मागणी मात्र पोलीसांनी परवानगी नाकारत खरात यांना ताब्यात घेतले . पेशवाईमध्ये दलितांना थुंकण्यासाठी गळ्यात गाडगे आणि पाठीवर झाडू बांधण्याची सक्ती होती.सध्या राज्यात नव पेशवाई आली आहे असून, शांततेच्या दिशेने मार्गक्रम करणाऱ्या दलितांवर भीमा कोरेगावमध्ये हल्ला झाला.संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येवूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही.हा एक प्रकारे नवीन पेशवाई आल्याचे लक्षण असून त्याविरोधात हे आंदोलन असल्याचे खरात यांनी सांगितले