दिवाणी दावे लवकर निकाली निघणार !

दिवाणी दावे लवकर निकाली निघणार !

मुंबई : न्यायालयीन वाद प्रकरणांच्या प्रलंबिततेसह एकाच प्रयोजनासाठी वारंवार केल्या जाणाऱ्या अर्जांवर निर्णय देण्याचे न्यायालयाचे काम कमी करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता-१९०८ मधील कलम ९ (क) वगळण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच यासंबंधीचा अध्यादेश प्रख्यापित करण्यासही मंजुरी देण्यात आली.

बदलत्या परिस्थितीत न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्याच्या मार्गात कलम ९ (क) हे मोठा अडथळा बनले आहे.कलम ९-क खाली मुद्दा उपस्थित केला गेल्यास जोपर्यंत न्यायालय निष्कर्षापर्यंत येऊन अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत संबंधित अर्ज न्यायालयाकडे प्रलंबित राहतो. परिणामत: दिवाणी दावा वर्षानुवर्षे प्रलंबित राहतो व अंतरिम निर्णय हाच अंतिम निर्णय असल्याचे भासते. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर एकदा प्राथमिक मुद्दयावर व दुसऱ्यांदा उर्वरित मुद्द्यांवर अशी दोन वेळा सुनावणी घ्यावी लागते. प्रत्येक मुद्द्यावर पुन्हा अपिल व विशेष अनुमती याचिका दाखल होतात.या सर्व बाबींमुळे वेळ व साधनांचा अपव्यय होऊन न्यायालयावर कामाचा दुप्पट भार पडतो. त्यामुळे न्यायालयीन वाद प्रकरणांची प्रलंबितता आणि न्यायालयाचे काम कमी करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता-१९०८ मधील कलम  ९ (क) वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

Previous articleगाडगे आणि झाडू बांधून मंत्रालयासमोर आंदोलन
Next articleराज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here