विशाल कारिया, बाळा खोपडेची सीबीअाय चौकशी करण्यात यावी – नितेश राणे यांची मागणी
मुंबई : सरत्या वर्षअखेरीस कमला मिल्स कंपाऊंडमध्ये जे काही भीषण अग्नितांडव घडले, त्यात१४ जणांना अापले प्राण गमवावे लागले. या प्रकरणामागील मास्टरमाईंड हे विशाल कारिया अाणि बाळा खोपडे असल्याचा सवाल काँग्रेस अामदार नितेश राणे आज मुंबईत अायोजित पत्रकार परिषदेत केला. ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अाज सकाळी बुकी विशाल कारियाला ताब्यात घेतले अाहे. त्याच्या घराच्या बाहेर मोजोस बिस्त्रोच्या मालकांच्या गाड्या अाढळून अाल्या अाहेत. त्यामुळे कमला मिल अाग प्रकरणानंतर विशाल कारियाने कुणाकुणाला फोन केले, कुणाची भेट घेतली, यासाठी त्याची सीबीअाय चौकशी करायला हवी. त्याची नार्को टेस्टही करायला हवी, अशी मागणीही राणे यांनी केली.
कमला मिलमधील अागीला १० दिवस पालटून गेले तरी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात अालेली नाही. मोजोस बिस्त्रो अाणि वन अबव्ह या दोन्ही पबच्या मालकांपैकी अद्याप एकालाही अटक करण्यात अालेली नाही. अाता या प्रकरणी ताब्यात घेण्यात अालेल्या विशाल कारियाची राज्य अाणि केंद्र सरकार सीबीअाय चौकशी करणार का, हा माझा सवाल अाहे. विशाल कारियाला पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर अाम्ही विधीमंडळात अावाज उठवू, असा इशाराही स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेल्या नितेश राणे यांनी दिला. विशाल कारिया हा एक बुकी असून त्याचे अनेक क्रिकेटपटूंशी तसेच अायपीएस, अायएएस अधिकाऱ्यांशी संबंध अाहेत. मुंबई पोलिसांनी अलीकडेच जोजो आणि डीके या क्रिकेटबुकींना अटक केली होती. या बुकींशीही कारिया कायम संपर्कात होता. तसेच अनेक क्रिकेटपटूंशीही कारियाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा आरोप नितेश राणे यांनी पुराव्यानिशी केला.
अायुक्तांवरील दबावप्रकरणी नितेश राणेंची न्यायालयात जनहित याचिका
कमला मिल प्रकरणात एका राजकीय नेत्याने माझ्यावर दबाव अाणला, असा गौप्यस्फोट मुंबई महापालिका अायुक्त अजोय मेहता यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मुंबईकरांच्या हितासाठी अायुक्तांना पत्रकार अाणि सर्वसामान्य नागरिकांना माहिती द्यायची नसेल तर त्यांनी ती कोर्टाला माहिती द्यावी, यासाठी अाम्ही त्यांच्याविरुद्ध जनहित याचिका दाखल केली अाहे, असेही नितेश राणे म्हणाले.
हुक्कामुक्त मुंबईसाठी स्वाभिमान पक्षाचा लढा कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार नितेश राणे यांनी केला. मुंबईतील हुक्का पार्लर बंद व्हावेत, यासाठी अाम्ही स्वाक्षरी मोहिम हाती घेतली अाहे. कमला मिल प्रकरणात कोण कुणाला वाचवत अाहे, याची माहिती सर्वांसमोर यावी, यासाठी अामचे प्रयत्न सुरू राहणार असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.बाळा खोपडे याच्या गाडीवर अामदाराचा लोगो अाहे. नियमानुसार यासाठी दोन वर्षांची शिक्षा असते. पण त्याला अद्याप अटक करण्यात अालेली नाही. तो बिनबोभाटपणे मोकाट फिरतोय. त्याला केव्हा अटक करणार, असा सवालही नितेश राणे यांनी विचारला.