राज ठाकरे व्यंगचित्रातून तडाखे देणार !
मुंबई : बरेच दिवस आपली भेट नाही, व्यंगचित्रांतून पण आपल्याशी बोलणे झाले नाही. गेल्या वीस दिवसात मध्ये इतकं काही घडलंय की व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) जरा जास्तच वाढलाय हे मलाही मान्य आहे. पण कोणत्याही सत्ताधाऱ्यांसारखा अनुशेष तसाच ठेवणाऱ्यातला मी नाही. ज्यांना व्यंगचित्रातून तडाखे द्यायचेत त्यांना ते देणारच अशा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक वाॅल वरून दिला आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या घरगुती कारणामुळे काही दिवस व्यंगचित्रापासून दुर होते.गेल्या काही दिवसामध्ये मोजोस पब येथे लागलेल्या आगीवरून सुरू झालेले राजकारण, भीमा कोरेगाव दुर्घटनेनंतर पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद आदी गोष्टीवर काही दिवसामध्ये राज ठाकरे हे आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातुन तडाखे देण्याची शक्यता आहे.तसा इशारा त्यांनी आपल्या फेसबुक वाॅलवरून दिला आहे. “मी गोष्टी पाहत होतो, त्यातले बारकावे समजून घेत होतो. आता व्यंगचित्रांचा हा बॅकलॉग भरुन काढणार आहे. यांच्या तडाख्यातून सुटलो असं कोणाला वाटलं असेल तर तसं काही समजून घेऊ नका. ज्यांना व्यंगचित्रातून तडाखे द्यायचेत त्यांना ते देणारच. आता अधिक काही बोलत नाही. लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल. तुम्हाला आवडेल नक्की. ज्यांना त्रास व्हायचाय त्यांना होईल असे नमुद करून राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.