भिडेंच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका

भिडेंच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका

अॅड.प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट

मुंबई : भिमा-कोरेगाव हिंसाचारानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेले संभाजी भिडे यांच्या हस्तक हस्तकाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केला आहे.

संभाजी भिडेंच्या हस्तकाने फेसबुकवर मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचे आवाहन केल्याचे सांगत त्या संबंधीच्या फेसबुकवरील पोस्टही प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांना दाखवल्या.रावसाहेब पाटील असे हस्तकाचे नाव असून, रावसाहेब पाटील याने १ जानेवारीला फेसबुकवर एक पोस्ट टाकली असून, या पोस्टनुसार मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि सुधींद्र कुलकर्णी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मुख्यंमत्र्यांच्या जीवाला धोका असल्याच्या अशा पोस्टबद्दल पुण्याच्या पोलिस आयुक्तांपासून गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांना माहिती असूनही जाणिवपूर्वक पोलिसांकडून ही माहिती मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आली नसल्याचा धक्कादायक आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. अशा पोस्ट करणा-या विरोधात त्वरीत कारवाई करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी बापटांवर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा
Next articleराज्याला विकास आणि एकोप्याच्या वातावरणाची गरज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here