स्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी वेगळा प्रवर्ग ठेवणार

स्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी वेगळा प्रवर्ग ठेवणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जाती- जमातींसाठी राखीव असलेल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ होत नाही. ही बाब लक्षात घेता अनाथ विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एक विद्यार्थिनीने नुकतीच भेट घेऊन याबाबतची आपली समस्या मांडली होती. तिला चांगले गुण असले तरी खुल्या गटातून निवडीसाठी पात्र होण्याइतके गुण नव्हते. त्यामुळे ही समस्या लक्षात आली असून, या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकेल असा निर्णय घेण्यात येणार आहे.

Previous articleमुद्रा योजनेत देशातील अव्वल तीन राज्यात महाराष्ट्राचा समावेश
Next articleपत्रकारितेमध्ये विजय वैद्य यांची निस्पृह व रोखठोक भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here