विद्युत सुरक्षा सप्ताहाचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने आज पासून संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. येत्या १७ जानेवरीपर्यंत हा सप्ताह साजारा केला जाणार आहे.या कार्यक्रमाला ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, ऊर्जा सचिव अरविंद सिंह उपस्थित होते.
या सप्ताहा दरम्यान सुरक्षित वीज वापरासोबतच संयमित वीज वापराबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्युत निरीक्षणालयाचे ऊर्जा विभागात समावेश केल्यानंतर दोन वर्षापासून विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. विजेचा वापर करताना काय खबरदारी घ्यावी याबाबत सप्ताहात मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे वीज अपघाताबाबत बऱ्यापैकी नियंत्रण आणण्यात यश प्राप्त झाले आहे.