भीमा कोरेगाव सारख्या घटना होवू देऊ नका
पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : भीमा- कोरेगाव घटनेवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भीमा कोरेगाव सारख्या घटना होवू देवू नका, असा आदेश त्यांनी आज भाजप पदाधिका-यांना दिला आहे.
नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या भाजप पदाधिका-यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. भीमा कोरेगावच्या दंगलीच्या सूत्रधारांचा बिमोड करतानाच जातीय विद्वेष रोखण्याचे आवाहन त्यांनी केले. भीमा कोरेगाव सारख्या घटना घडवून समाजात फुट पाडणाऱ्यांना धडा शिकवा,’ असे आवाहनही त्यांनी केले.या घटना समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि फूट पाडणाऱ्या असल्यातरी भाजप आणि संघ कसलीही अप्रिय घटना घडू देणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.भीमा कोरेगाव जवळील सणसवाडी गावात दोन गटांमध्ये झालेल्या वादात गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.