मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती

मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : एमयुटीपी प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात येणाऱ्या विविध रेल्वे प्रकल्पांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला. उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सुचविलेल्या विविध प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेऊन ती कामे सुरू केली जातील, अशी ग्वाही रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.

सीएसएमटी – पनवेल दरम्यान फास्ट इलेव्हटेड कॉरिडॉर विकसित करणे, पनवेल ते विरार दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर विकसित करणे, हार्बर लाइनम गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढविणे, ईतर काही रेल्वे मार्ग वाढविणे अशा विविध प्रकल्पांची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच लोअर परेल, खार रोड, गोरेगाव, मीरा रोड, विरार, घाटकोपर, डोंबिवली, नालासोपारा, भाईंदर, मुलुंड, डोंबिवली, भांडुप, वडाळा रोड, सायन, जिटीबी नगर, चेंबूर, शाहाड आदी विविध रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात यावे, अशी विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. या सर्व प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मान्यता देऊन हे सर्व प्रकल्प सुरू केले जातील, असे रेल्वे मंत्री गोयल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून मुंबईत रेल्वेची विविध कामे हाती घेण्यात येत आहेत. एकीकडे मेट्रो आणि दुसरीकडे रेल्वेचे नवीन प्रकल्प यांच्या माध्यमातून भविष्यात सामान्य मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुखकारक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रेल्वे मंत्रालयाकडे या सर्व प्रकल्पांबाबत पाठपुरावा करणे तसेच या प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडील निर्णय घेण्याचे दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.मुंबईत रेल्वेचे जाळे विकसित करताना रेल्वे, एमएमआरडीए, सिडको, महापालिका अशा विविध संस्थानी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी रेल्वे मंत्री गोयल यांनी दिल्या.

Previous articleमहाराष्ट्राची दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल
Next articleमुंबई शॉपिंग महोत्सवातून पर्यटनाबरोबर अर्थव्यवस्थेला मोठी चालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here