मुंबई शॉपिंग महोत्सवातून पर्यटनाबरोबर अर्थव्यवस्थेला मोठी चालना

मुंबई शॉपिंग महोत्सवातून पर्यटनाबरोबर अर्थव्यवस्थेला मोठी चालना

मुख्यमंत्री

मुंबई : पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई शॉपिंग महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईबरोबर महाराष्ट्राच्या पर्यटनाला आणि येथील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बिकेसी येथील जिओ गार्डन येथे आज या महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार प्रसाद लाड, अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, एम.टी.डी.सीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा महोत्सव १२ ते ३१ जानेवारी दरम्यान चालणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचे आकर्षण जगभरात आहे. या शहराकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आयोजित केलेला हा महोत्सव निश्चित उपयुक्त ठरेल. या महोत्सवातून मुंबईचा एक ब्रँड प्रस्थापीत होइल. दरवर्षी किमान एक महिना हा महोत्सव घेण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.मुंबईच्या पर्यटन आणि अर्थव्यस्थतेला चालना देणारी ही अभिनव संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले.मंत्री रावल यावेळी म्हणाले की, मुंबईत रिक्षापासून विमानापर्यंत तर वडापावपासून पंचतारांकित हॉटेलापर्यंत ३६० डिग्री पद्धतीने सुविधा उपलब्ध आहेत. शॉपिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, फूड स्टॉल अशा विविध माध्यमातून शॉपिंग महोत्सव हा सांस्कृतिक महोत्सवही होणार आहे. यापुढील काळात हा लोकोत्सव आणि महामहोत्सव बनविण्यात येईल, असे ते म्हणाले.

Previous articleमुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार गती
Next articleपंकजाताई मुंडे यांचे विदर्भवासियांनी केले जोरदार स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here