चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री
नागपूर : राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शासनाने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज शासकीय परिपत्रक जारी केले आहे.
यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांची भंडारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर आता पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. बावनकुळे यांच्याकडे आता नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे भाजपाचे कार्यकर्ते, बावनकुळे यांचे चाहते आणि मित्र परिवाराने या नियुक्तीबद्दल बावनकुळे यांचे अभिनंदन केले आहे.