धनंजय मुंडे यांनी वाचवले अपघातग्रस्त मोटार सायकल चालकाचे प्राण

धनंजय मुंडे यांनी वाचवले अपघातग्रस्त मोटार सायकल चालकाचे प्राण

उस्मानाबाद :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेसाठी उस्मानाबादला निघालेल्या विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रस्त्यात अपघात झालेल्या एका मोटार सायकलस्वारास वेळीच मदत करून त्याचे प्राण वाचवले.

काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कळंब ढोकी रस्त्यावर पिंपळगाव वाटी जवळ उस्मान शेख निपाणी हा ४५ वर्षीय व्यक्ती मोटारसायकलवरून जात असताना रस्त्यात आलेल्या म्हशीला मोटार सायकलची जोरदार धडक बसली यामध्ये उस्मान शेख हा व्यक्ती जखमी होऊन रस्त्यावर पडला. त्याच्या डोळ्यातून मोठा रक्तस्त्राव होऊ लागला होता. त्याच वेळी कळंबहुन उस्मानाबादकडे जात असलेल्या धनंजय मुंडे यांनी रस्त्यावरील जखमी व्यक्तीस पाहून गाडी थांबवली. स्वतः खाली उतरून त्या जखमी व्यक्तीची पाहणी केली . सोबतच्या पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस गाडीमधून तातडीने जखमीस उस्मानाबादच्या रुग्णालयात रवाना केले, मला बंदोबस्ताची गरज नाही आधी याला तातडीने घेऊन जा अशा सक्त सूचना देत उस्मानाबादच्या रुग्णालयातील डॉक्टरांनाही रूग्णाची काळजी घेण्याच्या सूचना देऊन ते उस्मानाबाद कडे रवाना झाले. सध्या शेख उस्मानवर उपचार सुरु आहेत.

Previous articleराज्यात गेल्या तीन वर्षात ५० लाख शौचालयांची उभारणी
Next articleज्यांनी भाजपची सत्ता आणली त्यांचेच बळी जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here